You are currently viewing जपते मंत्र पिरतीचा

जपते मंत्र पिरतीचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवण शाखा सदस्या कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लावणी*

 

*शीर्षक- जपते मंत्र पिरतीचा*

(*प्रत्येक ओळीत १६ अक्षरे*

*यती ९ व्या अक्षरावर* )

 

पिरतीचा मंत्र जपुनी, करीतेओ साधना

राया तुमच्या भेटीसाठी, आतुरली ललना ॥ धृ.॥

 

आठवांची प्रीत सुमने, हृदयात जपली

मनमोहक स्वप्नफुले, ओंजळीत भरली

पिरमाची तार छेडुनी, आळविते प्रार्थना

पिरतीचा मंत्र जपुनी, करीतेओ साधना ॥१ ॥

 

पेशवाई साज लेऊनी, आली बघा तारका

घुगरांच्या तालावरती, थिरकते मेनका

सुगंधीत प्रीतसुमने, उधळाना साजना

पिरतीचा मंत्र जपुनी, करीते ओ साधना ॥ २ ॥

 

भिरभिरत्या नजरेने, घेते शोध तुमचा

हळूच डोळा मारुनिया, द्या आहेर घरचा

तुमच्या मनी बसण्याची, एकच आराधना

पिरतीचा मंत्र जपुनी, करीतेओ साधना ॥ ३ ॥

 

*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा