You are currently viewing बांदा येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक गंभीर…

बांदा येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक गंभीर…

बांदा येथील दुचाकी अपघातात सावंतवाडीतील युवक गंभीर…

बांदा

सावंतवाडी येथील युवकाचा बांदा येथे अपघात झाला आहे. सुनील वाघमोरे असे त्याचे नाव आहे. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून त्याला आता गोवा-बांबूळी येथे हलविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख यांनी दिली. तो मोपा एअरपोर्टवर कामाला आहे. तिथून घरी येत असताना हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही. त्याला अधिक उपचारासाठी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा