You are currently viewing बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळून रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरु केली आहे. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यचळ मिळणार आहे. आस्थापनामध्ये रुजू होणाऱ्या १२ वी पास प्रशिक्षणार्थीना ६ हजार, आयटीआय व पदविका प्रशिक्षणार्थीना ८ हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन ११ महिन्यापर्यंत मिळणार आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी या विभागाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अदिवासी असणारे, उमेदवारांची वयोमर्यादा किमान वय १८ व कमाल ३५ तसेच किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर (शिक्षण चालू असलेले उमेदवार, NAPS, MAPS उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.) आपले आधार नोंदणी असणारे बँक खाते व आधार संलग्न मोबाईल क्रमांक उमेदवारांनी या विभागाच्या https://www.cmykpy.mabaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.

आपली प्रोफाईल अद्यावत करुन या विभागाच्या वेब पोर्टलवर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना पतसंस्था, बँका शैक्षणिक सस्था इ. यांनी कार्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन रिक्त पदांची मागणी केली आहे. रिक्तपदाना अप्लाय करुन या योजनेचा लाभ घ्यावा व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी तसेच २० पेक्षा जास्त मजूर पदे असलेल्या शासकीय आस्थापनांनी आपल्याकडील प्रशिक्षणार्थीसाठीची रिक्तपदे शासन निर्णयानुसार पोर्टलवर अधिसूचित करण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क करावा. योजनेबाबतची सर्व कार्यवाही ही ऑपलाईन असल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर आस्थापनेने आपली नोंदणी करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी सर्व शासन निर्णयातील सुचनांचे पालन करून सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणे अनिवार्य आहे. रूजू करून घेतलेल्या प्रशिक्षणार्थीची उपस्थिती Aadhar Enabled Biometric Attendance System (AEBAS) द्वारे नोंदविण्याबाबत दिनांक २८ मार्च २०२५ च्या शासन निर्णयात नमुद आहे. त्यानुसार संबंधित कार्यालय/आस्थापना यानी ऑनलाईन प्रक्रिया करणे अनिवार्य आहे.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२३६२-२२८८३५ वा  दुरध्वनीवर संपर्क साधावा किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयास प्रत्यक्ष भेट द्यावी, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा