You are currently viewing मित्रा…

मित्रा…

*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मित्रा…*

 

नसेन मी या जगात तेव्हा

कदाचित श्रद्धांजलीचा

महापूर येऊन जाईल

कौतुकाचे गोडवे गान्यासाठी

हजारो मित्रांचा

लोटून दिलेला महासागर……

 

कोणी हजेरी लावील

कोणी असण्याचा भास निर्माण करेल

तर कोणी गर्दी पाहण्यासाठी सुद्धा…

 

पण तुझ्यासारखा

जिव लागणारा मित्र

अंतिम दर्शनासाठी

आतुर झालेला असेल

डोळ्यातील आसवांना

वाट मोकळी करून देत….

 

माझ्यासाठी केविलवाना

झालेला चेहरा

तुला समजाविण्यासाठी

आतुरलेली जीभ

निशब्द झालेली असेल

तुला पाहण्यासाठी

आसूसलेले डोळे

तेव्हाच बंद झालेले असतील…

 

त्या बाजार गर्दीमध्ये

कोणी हसतील

कोणी रडतील

कोणी आक्रंदनही करतील

आजच्या त्याच्या सवडी प्रमाणे

व्यक्तही होतील…

 

मग लागतील

पेपरच्या बातम्यांचे ढीग

जो तो भरभरून लिहिलं

तेंव्हा ना मी ऐकायला असेन

ना पाहायला

ना वाचायला

म्हणून म्हणतो मित्रा

गोड बोलून घे

मनसोक्त हसून घे

मस्तपैकी भेटूनही घे

कारण उद्याचे दिवस

पाहिलेत कोणी…….

 

ऊडूदेत शब्दांचे फुलोरे

रंग गगनी पसरू दे

हसून एकदा मित्रा

तुझे स्माईल मित्रांसाठी

असे वरदान ठरु दे.

 

 

भूमिपुत्र वाघ.

प्रतिक्रिया व्यक्त करा