You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये शैक्षणिक वर्ष 2025- 26 च्या क्रीडा दिनाचे आयोजन 27 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लेझीमच्या शिस्तबद्ध तालावर संस्थेचे विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, सदस्य श्री जयप्रकाश सावंत आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित विविध क्रीडा प्रकारात पहिली ते दहावी पर्यंतची सर्व मुले उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी हिटिंग द बॉटल, कोन जम्पिंग ,रनिंग, लंगडी रेस, पिकअप द पेपर विथ स्ट्रॉ, बुक बॅलन्सिंग, स्टॅच्यू गेम,चिकन रेस ,बॉल इन द बास्केट, डॉजबॉल, स्टिक कॅचिंग,थ्रो बॉल , सॅक रेस, रिले इत्यादी विविध क्रीडा प्रकारांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सदर खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती व शिस्तपालन यांचा मेळ साधत आपले क्रीडा कौशल्य सादर केले.
या क्रीडा स्पर्धा हाऊस ऑफ ऑनर, हाऊस ऑफ पर्सीवरन्स, हाउस ऑफ ब्रेव्हरी, हाऊस ऑफ पीस या चार हाऊसेस मध्ये घेण्यात आल्या. यामध्ये हाऊस ऑफ ऑनर प्रथम क्रमांक, हाउस ऑफ ब्रेव्हरी द्वितीय क्रमांक, हाउस ऑफ पर्सीवरन्स तृतीय क्रमांक व हाऊस ऑफ पीस ने चौथा क्रमांक पटकावला.क्रीडा दिनाच्या समारोप प्रसंगी सर्व हाऊसेस ना संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा दिनाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीम.इंतिजिया फर्नांडिस यांनी केले. क्रीडा दिनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री भूषण परब, सहशिक्षक श्री योगेश चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
क्रीडा दिनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर ,पालक – शिक्षक संघ यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा