*तांबुळी टेंबवाडी व स्मशानभुमी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न*
*ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली*
बांदा
तांबुळी येथील मुख्य रस्ता ते टेंबवाडी जाणारा रस्ता व मुख्य रस्ता ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज तांबुळी सरपंच वेदीका नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यामुळे येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पावसाळ्यात चिखल-माती आणि इतर वेळी धुळीमुळे नागरिक व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
यावेळी बोलताना सरपंच श्रीमती नाईक म्हणाल्या की, “विकासकामांत रस्ते हा महत्त्वाचा घटक असून, दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.”
या कार्यक्रमाप्रसंगी तांबुळी सरपंच वेदिका नाईक, भाजपा बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, तांबुळी उपसरपंच जगदीश सावंत, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई, शर्मिला सावंत, माजी सरपंच अभिलाष देसाई, अनंत सावंत, रामचंद्र सावंत, रुपाली सावंत,अनुष्का सावंत, मनीषा सावंत, गौरी तांबुळकर, परेश देसाई, अमेय देसाई, विकास नाईक, तेजस सावंत,आप्पा धामापूरकर, सदाशिव मोर्ये तसेच परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने व रस्ता कामाला सुरुवात झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
