*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅलेंडर..*
जुनाटं भींतीवरच फडफडत
राहणार ते कॅलेंडर सारखं
सरत्या दिवसांची आठवण
करून देतं..
त्याला फेकून द्यावंसं वाटतं
लाल चौकोनांत बांधून टाकणार
तारखेची निष्प्राण आकडे दाखविणार
छोट्या आयुष्यातील एकेक दिवस
भूतकाळांत लोटणार
वरच्या वर्षाचा आकडा पाहिला तर
मधली इतकी वर्षे कुठं-कशी हरवली
कळतच नाही
त्या वर्षांच नेमकं झालं तरी काय ?
नकोच तो वर्षांचा हिशोब
कॅलेंडरला रद्दीतचं जमा
करावं लागणार
दमेक-या सारखी दीर्घ श्वास घेणारी
त्याची उरली सुरली पाने
फाडावीच लागणार
मला स्वैर माणूस म्हणून जगायचं
जीवनाचा महोत्सव साजरा करायचा
बंदीवास झुगारून,चौकटीतून कायमच बाहेर पडायचं
लाल काळया चौकटीतून
बाहेर पडायचं ..
अजूनही.. सावली माझी शुभ्र
आजही ..प्रतिबिंब माझं ओलं
दीर्घ श्वास ..घेणा-या जाणीवा
ओझं शुभेच्छाचं ..नको होतं
बंदिवान नाही मी..वर्षांचा
चौकटीतून बाहेर निघायचं
कॅलेंडर मला फाडायचं..
बाबा ठाकूर
