पावन मारूती मंदिर, यमुनानगर – नाना नानी उद्यानातील सभागृहात यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघाची 30 डिसेंबर 2025 रोजी मासिक सभा संपन्न झाली. संघाची प्रार्थना झाल्यानंतर कै. स्मिता इनामदार व कै. सुधीर जपे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष गजानन ढमाले यांच्या प्रास्ताविकानंतर सौ. उषा गोविंद खवासखान यांचे भाषण झाले. आपल्या भाषणात अन्नदान ,कन्यादान, सतपात्री दान, महिला कालच्या व आजच्या ,जुनी संस्कृती, संस्कार, प्रथा, जुन्या चालीरीती, नवा व जुना काळ त्यातील झालेले बदल पोशाख, राहणीमान यावर उदाहरणासहित भाष्य केले. राणी चेन्नम्मा,राणी लक्ष्मीबाई व राजमाता जिजाऊ यांची उदाहरणे दिली.
‘पिंपरी चिंचवड वैभव’ या महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पिंपरी चिंचवड शहरावर आधारित काव्यमय इतिहास असलेल्या पुस्तकात आपल्या संघातील तीन कवयित्रींचा सहभाग आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. या सभेत कवयित्री माधुरी डिसोजा, श्रीमती मंगला पाटसकर ,श्रीमती सुहासिनी येवलेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी आपल्या कविता सादर केल्या.
डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेले श्रीमती सुशीला कवळे श्रीमती उषा जोशी सौ. मालती जोशी श्री विठ्ठलराव तुपे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीमती मंगला पाटसकर यांनी केले. श्री. दत्तात्रय गुंजाळ, श्री. बाळासाहेब चव्हाण, श्री. अशोक नहार ,श्री. प्रदीप मुजुमदार, श्री. अण्णा रसाळ, श्री. प्रमोद देवकर, श्री गोविंद खवास खान यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
श्रीमती मंगला पाटसकर यांनी आभार मानले. चहापान व अल्पोहारा नंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
