You are currently viewing आर.पी.आय.मजबूतीसाठी रमाकांत जाधव व अजितकुमार कदम यांचा 4 व 11 जानेवारी 2026 रोजी कुडाळ व मालवण जनसंपर्क दौरा

आर.पी.आय.मजबूतीसाठी रमाकांत जाधव व अजितकुमार कदम यांचा 4 व 11 जानेवारी 2026 रोजी कुडाळ व मालवण जनसंपर्क दौरा

आर.पी.आय.मजबूतीसाठी रमाकांत जाधव व अजितकुमार कदम यांचा 4 व 11 जानेवारी 2026 रोजी कुडाळ व मालवण जनसंपर्क दौरा

जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे याची माहिती .

सिंधुदुर्ग

जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्ष मजबूत करण्याबरोबरच जिल्ह्यातील जनतेचे विकास प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याच्यादृष्टीने व्यापक प्रयत्न केले जातील त्यासाठी प्रमुख पदाधिकारी कुडाळ व मालवण चा जनसंपर्क दौरा करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे यांनी दिली.

विश्व भूषण डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष येत्या काळात जनतेच्या अन्यायकारक प्रश्नावर आवाज उठविणार आहे,जनतेचे विकासाचे व अन्यायकारक प्रश्न समजून घेण्यासाठी रविवार दि.04 जानेवारी 2026 रोजी कुडाळ तालुका व शनिवार दि.11 जानेवारी2026रोजी मालवण तालुका दौरा निश्चित केला आहे.
दौरा कार्यक्रमात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-मा.रमाकांत जाधव, जिल्हाध्यक्ष – मा.अजितकुमार कदम,जिल्हा संघटक – ॲड.एस.के.चेंदवणकर,खजिनदार -आनंद पेंडूरकर,पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग नगरपंचायत च्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव व युवक आघाडी जिल्हाध्यक्ष-ॲड.अशोक जाधव तसेच महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा -सौ.जागृती सासोलकर,जिल्हा सरचिटणीस-सौ.निताली कांबळे,जिल्हा सहसचिव -सौ.प्रगती कांबळे ,जिल्हा खजिनदार -सौ.समिधा निगुडकर हे सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रकाश कांबळे यांनी दिली.
दिली.
प्रकाश कांबळे पुढे म्हणाले की,प्रत्येक तालुक्यात व गावा गावात शाखा निर्माण करण्यावर भर असेल तसेच जनतेचे रस्ता ,पिण्याचे पाणी,समाज मंदिरे,स्मशानभूमी ,अनुदानीत कर्ज प्रकरणे,जात प्रमाणपत्र याबाबतचे प्रश्न समजून घेण्यात येणार,आणि अन्यायकारक प्रश्न प्रशासन पातळीवर मांडून प्रसंगी आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा