You are currently viewing वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समिती निवडी बिनविरोध

वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समिती निवडी बिनविरोध

वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समिती निवडी बिनविरोध

वैभववाडी :

वाभवे येथील वैभववाडी नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. नगरपंचायतीच्या तीन सभापती आणि एका उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र सर्व पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली.
बांधकाम विषय समितीच्या सभापतीपदी रणजीत तावडे यांची फेरनिवड करण्यात आली. शिक्षण व आरोग्य विषय समितीच्या सभापतीपदी सुभाष रावराणे, महिला व बालकल्याण सभापतीपदी सानिका रावराणे, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सुंदराबाई निकम यांची निवड जाहीर करण्यात आली.
दुपारी दोन वाजल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी अधिकृतपणे निवडीची घोषणा केली. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्यासह संजय सावंत, डॉ. राजेंद्र पाताडे, नेहा माईणकर, रोहन रावराणे, राजन तांबे तसेच नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा