*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*व्यक्तीमत्व ..पुन्हा गवसले….!!*
माझ्या मनाचा कोपरा
मीच ..हळवा केला
स्पर्शही न करता
ह्दयी झोका झुलला..
बंदमनाची दार-खिडक्या उघडल्या
स्वातंत्र्याचा गंध लाभला
शहाण्याचा ..अर्धवेडा होताचं
डोक्यावरून ..कावळा उडाला…
मुक्यानं हरवलेलं.. फाटकं
व्यक्तीमत्व पुन्हा गवसले
कोकीळेला घरटं मिळालं
जगण्याचे.. अर्थ कळाले..!
कुणालाच न सांगता
पुढे निघून जाईन
माती आकाशवारा प्रकाश
सुर्याच्यादिशेने फेकून देईन ..!
क्षितिज माझ्यावर झुकलं
जिव्हाळा अंगणात आला
स्वातंत्र्याचा गंध मिळाला
शहाणा ….वेडा झाला…!
विस्कटली माझी नीज
माझं मीच ठरवतो
कोणालाचं न विचारता
आयत्याघरांत जाऊन राहतो..
आयतं व्यक्तीमत्व..पुन्हा गवसलं
निसटत्या आयुष्याचं……………. बोट धरू लागलं…
बाबा ठाकूर
