You are currently viewing कोकणसिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नॅशनल पाॅवर लिफ्टिंग मध्ये घवघवीत यश

कोकणसिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नॅशनल पाॅवर लिफ्टिंग मध्ये घवघवीत यश

कोकणसिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे नॅशनल पाॅवर लिफ्टिंग मध्ये घवघवीत यश

देवगड

इंदोर येथे पार पडलेल्या पाॅवर लिफ्टिंग इंडियाच्या वेस्ट झोन नॅशनल पॉवरलिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये आपल्या कोकणसिंधू पाॅवर लिफ्टिंग सिंधुदुर्गच्या सात खेळाडूनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दीप जाधव, वेदा साटम यांना ब्रॉन्ज मेडल तसेच हर्ष सावंत सिल्वर मेडल व हेमांगी मेस्त्री हीला गोल्ड मेडल प्राप्त झाले .तसेच आयुष नाईक चतुर्थ क्रमांक, पृथ्वीराज राठोड पाचवा क्रमांक, मुस्कान सारंग पाचवा क्रमांक प्राप्त झाला . आपल्या कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग खळाडूनी प्रथमच वेस्ट झोन नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेऊन दैदिप्यमान असे यश संपादन केले आहे. या सर्व खेळाडूंना श्री संजय साटम व श्री गणेश वायंगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सदर स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडूंना श्री संजय साटम आणि श्री शशांक साटम यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले

प्रतिक्रिया व्यक्त करा