*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतचं…माझं जगणं..!!*
मायेचं आभाळ कॅमे-याने
निरभ्र अधिरतेनं पांघरलं
वेटोळं घालून माझ्याभोवती
प्रतिबिंबाचं वारूळ उभारलं..
कधीकाळी आपलीच हक्काची
माणसं अनोळखी होतात
कॅमेर्यानेचं नात्यांना जपलं
उगाच पुरावे..मागतात..
शुभ-अशुभाच्या आभासी वास्तवावर
दुनिया..फोटोशाॅपवर चालत नाही
घडायचं तेचं..घडतं..कॅमे-यात
अंधश्रद्धेला …स्थान नाही..
असंख्य ..स्वप्नांचे प्रदेश
माझ्या..हातातून निसटून गेले
कोशात लपणारे..व्यक्तिमत्व
वेषांतर करून..वावरू लागले..
एक आगळा वेगळा..डाव
जीवनभर कॅमेर्यानेचं मांडला
वास्तव..आभासी करून घेतलं
दुनियेशी झगडा ..कधीचा सोडला..
बाबा ठाकूर
