क्रीडा संकुल ओरस येथे कु. चिनार राणेची धावण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
ओरस
क्रीडा संकुल ओरस येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये डॉन बॉस्को हायस्कूलच्या वतीने सहभागी झालेल्या कु. चिनार चंद्रहास राणे याने 10 वर्षाखालील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु. चिनार राणे याने तिसरा क्रमांक, तर 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्वल केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या क्रीडा स्पर्धांमध्ये मैदानी खेळांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत क्रीडा कौशल्याचे उत्तम दर्शन घडविले. कु. चिनार राणे यांच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
