You are currently viewing तुलशी पूजन व बलिदान सप्ताह निमित्त गुरु गोविंदसिंहजी अभिवादन कार्यक्रम संपन्न

तुलशी पूजन व बलिदान सप्ताह निमित्त गुरु गोविंदसिंहजी अभिवादन कार्यक्रम संपन्न

*तुलशी पूजन व बलिदान सप्ताह निमित्त गुरु गोविंदसिंहजी अभिवादन कार्यक्रम संपन्न*

पुणे

चिखली – नेवाळे वस्ती, चिखली येथील गणेश सिध्दी ए विंग येथे दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी *तुलसी पूजन* उत्साहात संपन्न झाले.
गणेश सिध्दी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची सुरवात तिन वेळा सामुदायिक ओंकार, प्रार्थना व तुलशी पूजनाने झाली. उपस्थित मुलामुलींनी तसेच मातृशक्तींनी तुलशी पूजन केले.
यानंतर *सौ. शारदा रिकामे* यांनी तुळशीचे पर्यावरण, धार्मिक व औषधी वनस्पती म्हणून असलेले महत्व व उपयोग उपस्थितांना सांगितले. या बहुगुणी तुळशीला कुटुंबातील एक सदस्य म्हणून प्राचीन काळापासून स्थान दिले असून अगदी घरोघर तुळशी विवाह केला जातो. यासर्वांचा विचार करुन संपूर्ण देशात दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस *तुलशी पूजन दिन* म्हणून साजरा केला जातो.
त्याबरोबरच धर्मरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मोगलांना शरण न जाता धर्मरक्षणासाठी चार मुलांसह संपूर्ण परिवाराचे बलिदान देणाऱ्या *गुरु गोविंदसिंहजी* यांचे स्मरण केले जाते. त्यानिमित्ताने आज *आज प्रा. सौ. गुरमितकौर संतोषसिंग पुजारी* यांनी बलिदान कथा सांगितली. यावेळी सौ. मंदाकिनीताई घुसळे यांनी सौ. गुरमितकौर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
वंदेमातरम मातरम या राष्ट्रगीताला १५० वर्ष पुर्ण झालेली आहेत. त्याची माहिती दिल्यानंतर सामुदायिक संपूर्ण वंदेमातरम गायले. प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा