परांजपे सिटी, भुगांव (पुणे) येथे उत्साहात ख्रिसमस साजरा
पुणे | प्रतिनिधी
भुगांव, पुणे येथील परांजपे सिटीमध्ये ख्रिसमस निमित्त सर्व रहिवाशांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमात बिल्डिंगमधील नागरिकांनी एकूण ३० स्टॉल लावले होते. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
कार्यक्रमात लाईव्ह ऑर्केस्ट्रा, कराओके गाणी, आकर्षक ख्रिसमस ट्री, स्पीकरवर संगीत अशा विविध उपक्रमांनी वातावरण अधिकच आनंदी व उत्साही झाले होते. या सणाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाची शिकवण देणारा एक सकारात्मक संदेशही उपस्थितांना अनुभवता आला.
मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि या सुंदर आयोजनाचा मनमुराद आनंद घेतला. परांजपे सिटीचे मालक श्री. परांजपे यांनी या उपक्रमाबद्दल विशेष प्रशंसा केली. तसेच, सामाजिक व शैक्षणिक मूल्ये जपणारा असा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी आयोजक व रहिवाशांचे आभार मानले.
परांजपे सिटीमधील हा ख्रिसमस उत्सव केवळ सणापुरता मर्यादित न राहता एकोप्याचा, आनंदाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरला.
