शिवसेना नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी स्वीकारला पदभार
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण :
मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे यश मिळवले. दरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 25 डिसेंबर रोजी सकाळी मालवण नगरपरिषद येथे पदभार स्वीकारला आहे. मोठया उत्साहात त्यांचे मालवण नगरपरिषदेत स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उमेश नेरुरकर, मोहन वराडकर नगरसेवक दिपक पाटकर, नीना मुंबरकर, पुनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गांवकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा व उबाठा नगरसेवक उपस्थित होते.
