You are currently viewing सन्मानचिन्ह

सन्मानचिन्ह

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*’ सन्मानचिन्ह ‘*

जन्म दिला माऊलीने
पदरात जोजविले
तिच्या पदरात सदा
प्रेम वात्सल्य लाभले ||

आजी मावशी ताईचा
लाभे पदर मायेचा
येता कसले संकट
हात देती आधाराचा ||

चूक पदरात घेई
खूणगाठ पदराला
बांधी पदरी निखारा
वाण सतीचे बाईला ||

ओटी पदरात घेते
संसारात प्रवेशिता
सारे सर्वस्व सखीचे
पदरी सुरक्षितता ||

पदराचे आभूषण
खूण तिच्या सौंदर्याची
शोभे तिला प्रभावळ
शान तिच्या सन्मानाची ||

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा