You are currently viewing सुदन कवठणकरांकडून संजू परब यांचे अभिनंदन
Oplus_16908288

सुदन कवठणकरांकडून संजू परब यांचे अभिनंदन

सावंतवाडी :

अनेक विरोधकांचा सामना करत सावंतवाडी पालिकेत नगरसेवक म्हणून विजय मिळवणाऱ्या संजू परब यांचे शिवसेनेतर्फे अभिनंदन करण्यात आले. शिवसेनेचे ओबीसी जिल्हाप्रमुख सुदन ऊर्फ सुदा कवठणकर यांनी संजू परब यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संजू परब यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी चांगले आणि लोकहिताचे काम घडावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांच्या विजयातही संजू परब यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अजय गोंदावले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा