You are currently viewing आरोसबाग येथे शेकोटीच्या आगीत होरपळून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

आरोसबाग येथे शेकोटीच्या आगीत होरपळून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

आरोसबाग येथे शेकोटीच्या आगीत होरपळून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

बांदा : प्रतिनिधी

आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना आगीत होरपळून एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थंडीपासून बचावासाठी घराजवळ शेकोटी घेत असताना अचानक आग भडकली. यात अविनाश चांदेकर गंभीररीत्या होरपळले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. अविनाश चांदेकर हे येथील श्री स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या बांदा शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते आणि तेथून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा