स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यत अर्ज करण्यास मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील इयत्ता 11वी व 12वी तसेच इयत्ता 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
सन 2025-26या शैक्षणिक वर्षासाठी विद्यर्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती याप्रमाणे आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, सदर महाविद्यालयातील इ.11वी, 12 वी तसेच इ. 11 वी व इ. 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील.
सन 2024-25 वर्षामध्ये स्वाधारसाठी नोंदणी केलेले तसेच चालू वर्षात 2025-26 मध्ये प्रवेशित विदयार्थी स्वाधारसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची PDF व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह 1 जानेवारी 2026 पर्यंत नजीकच्या मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह/महाविद्यालय व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे समक्ष किंवा टपालव्दारे परिपुर्ण अर्ज सादर करावेत.
संबंधित महाविद्यालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करणेत यावे. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८८२ येथे सपंर्क साधवा.
