You are currently viewing सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा वर्धापन दिन

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा वर्धापन दिन

*सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोलीचा वर्धापन दिन*

आंबोली :

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली शाळेचा 22 वा वर्धापन दिन दि. 22 व 23 डिसेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सर्विसमेन असोसिएशन संचलित, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सैनिक प्रशिक्षण देणारी एकमेव नामवंत शाळा म्हणजे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली. प्रतिवर्षी सैनिक स्कूलमध्ये अत्यंत उत्साहात व नाविन्यपूर्ण वर्धापन दिन साजरा केला जातो. यावर्षी दि. 22 डिसेंबर व 23 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 05.30 वाजता विद्यार्थ्यांच्या विविध कलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळेच्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यात विद्यालयातील मुलांचे सैनिक संचलन, लेझीम, झांज, मल्लखांब, ज्युदो, कराटे, व्हॅली क्रॉसिंग प्रात्यक्षिके, अश्वरोहण, बक्षिस वितरण, वार्षिक अंक ‘वेध’ प्रकाशन, ऑबस्टॅकल्स डेमो इ. विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी 58 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.ओरोसचे कमांडट कर्नल अजय राज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी सैनिक स्कूलच्या सर्व पालकांनी, माजी विद्यार्थी व माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने वर्धापन दिनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ व सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा