*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*डाव पत्तानासे हाऊ…*
मनी अहिराणी माय
जशी दूधवर साय
रोज पेवो पानी तिना
धुईसनी नितं पाय…
बोल बोबडा शिकाडे
जलमता माय मनी
माय माडी म्हनतंस
घरोघर मंग कोनी…
अशी कशी गोडी तिनी
पघयस ती व्हटम्हां
थेट घुसस बोलता
मानोसना त्या पोटम्हा…
घट्यावर घुरुघुरु
दये मनी माय तठे
आपसुक गयाम्हान
गहिवर तिना दाटे…
मायमाहेरनी याद
येता तिले गहिवर
आसू गये टपटप
जसं पीठ भरभर…
सासुरवासीन व्हती
सारख्याच घरोघर
दयनं कांडनं रोज
तिच व्हती धरोहर…
हातले पडेत घट्टा
तरी पाठवर रट्टा
लगीन म्हनजे ऱ्हास
बजारना जसा सट्टा..
दान पडनं चांगलं
नशिब समजी लेवो
पदरम्हा पडनं ते
उख्खयम्हा डोकं ऱ्हावो..
डोकं फुटो का ऱ्हावो ते
हुंडूक ना फुटू देवो
मनं भलतं चांगलं
आसं गानं गात जावो..
जाई जाई जाशी कोठे
आठेज मरनं जगनं
धरं ते चावस हो
सोडं ते, ते पयनं…
व्हटं शि लेवो पक्का
जरी पडनात बुक्का
डाव पत्ताना से हाऊ
नशिबम्हा नही एक्का….
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
