५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ८८ प्रतिकृतींचे सादरीकरण; आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांचे दर्शन घडले. या प्रदर्शनात जवळपास ८८ विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या असून, प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ तसेच सिंधुदुर्ग डायोसिस एज्युकेशन ट्रस्ट संचलित मिलाग्रीस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. १७ व १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, गटशिक्षणाधिकारी सविता परब, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे, सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, फादर रिचर्ड सालदाना, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव रामचंद्र घावरे, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे व्ही. एम. कांबळे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती अप्सरा बेगम आवटी, विश्वकोश मंडळाचे सदस्य म. ल. देसाई, वैभववाडी गटशिक्षणाधिकारी श्री वडवळ, केंद्रप्रमुख शशिकांत ठाकर, रामचंद्र वालावलकर, श्री गोसावी, उदयसिंग पाटील, सुहास पाटील, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका सुषमा मांजरेकर, किशोर वालावलकर, शरयू आसोलकर, सरिता गावडे, भूपेंद्र पाटकर, विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गावडे, रुपेश धरणे, स्वप्निल राऊळ, प्रदीप सावंत, गणेश मर्गज, मुख्याध्यापक अभिजीत जाधव व सूर्यकांत चव्हाण सौ. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अनिता सडवेलकर व दत्ताराम नाईक यांनी केले.
