*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सहजगत्या मिळतं*
सहजगत्या मिळतं
आभाळ आणि धरणी
दिवस अन् रात्रही
निसर्गाची करणी….
इवलासा ओढा
नदीची खळखळ
अथांग सागराच्या
लाटा किनारी नितळ…
आईच्या वात्सल्याचा
पान्हा बाळास जगवतो
लहानाचा होतो मोठा
जगण्याची लढाई शिकतो…
एक दाणा पेरताच
मिळतात दाणे हजार
देऊन बघ आधी मानवा
नक्की फिटतात उपकार…
सारं मिळता सहजगत्या
माणूस होतो मग्रूर
जाणीव उरत नाही
बेपर्वा आणि क्रूर
सवार्थासाठी निसर्गाला
धरतो तो वेठीला
कु-हाडीचा दांडाच
घाव घालतो वृक्षाला….
सहजगत्या जे मिळाले
जतन त्याचे करावे
मोल जाणून उपकाराचे
ऋण सदैव मानावे….!!
✨✨✨✨✨✨✨✨
*अरुणा दुद्दलवार@✍️*
