You are currently viewing अभंग

अभंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अभंग रचना*

 

*अभंग* 🌹

 *(6/6/6/4)*

 

कार्तिकी महिना l उपवास आज ll

चढवीला साज l पांडुरंगा ll

 

गळा वैजयंती l तुळशीच्या माळा ll

शोभतो सावळा l कलियुगी ll

 

पहावा विठ्ठल l भजावा विठ्ठल ll

स्मरावा विठ्ठल l रात्रंदिनी ll

 

टाळ वीणा वाजे l पंढरी नगरी ll

पांडुरंग हरी l दंग होई ll

 

विठ्ठल नामात l गर्जली पंढरी ll

दंग वारकरी l भजनाशी ll

 

दुथडी भरली l माय चंद्रभागे ll

तुझी ओढ लागे l तीर्थासाठी ll

 

नामयाची जनी l नाथ नि तुकोबा ll

सावता, चोखोबा l

 

दर्शनाची आस l लागे पांडुरंग ll

तव नामी दंग l सर्वकाळी ll

 

पद्म नाभावरी l रुसली रुख्माई ll

राग सोड आई l आतातरी ll

 

उभा वीटेवरी l युगे अठ्ठावीस ll

जीव कासावीस l होऊ पाहे ll

 

विठु पांडुरंग l दिनांची सावली ll

भक्तांची माऊली l पंढरीशी ll

 

तुच माझी आस l तुच माझा ध्यास ll

तुच माझा श्वास l सर्व काही ll

 

*जय हरी विठ्ठल* 🚩🚩

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा