You are currently viewing सावंतवाडीतील सुवर्ण व्यावसायिक नारायण शिरोडकर यांचे निधन

सावंतवाडीतील सुवर्ण व्यावसायिक नारायण शिरोडकर यांचे निधन

सावंतवाडीतील सुवर्ण व्यावसायिक नारायण शिरोडकर यांचे निधन

सावंतवाडी :

सावंतवाडी शहरातील सुवर्ण व्यावसायात एक अत्यंत परिचित नाव असलेले आणि उभा बाजार परिसरात ‘बंड्या’ या नावाने ओळखले जाणारे नारायण उर्फ बंड्या दत्ताराम शिरोडकर (वय ६३) यांचे आज बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सुवर्ण व्यावसायिक तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘सुवर्ण ज्वेलर्स’चे मालक तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संजू शिरोडकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिरोडकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते मित्रपरिवारात आणि ग्राहकांमध्ये प्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच उभा बाजार परिसरातील सर्व सुवर्ण व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली.

दरम्यान, आज सायंकाळी उपरलकर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा