You are currently viewing ती.. . होडी कागदाची !

ती.. . होडी कागदाची !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ती.. . होडी कागदाची!*

 

मनाचा एक हळवा कोपरा,
बालपणातील अल्लड वारा,
सारे सोबती खट्याळ भारी,
मौज लुटती पावसात न्यारी,
पडता पाऊस आनंदे नाचती,
भिजत चिंब धुडगुस घालती.
कोणी येई कागद घेऊन,
कोणी ओरडे कालवा बनवून,
नदीचा मनात आभास खोटा,
ओहळच वाहे काढच मधुन वाटा,
भरभर जमती कागदी बोटी,
माझी … माझी झुंबडच ऊडे मोठी,
वारा ढकले त्या लुडबुड्या,
पोंचती वहात त्या पाण्याच्या काठा,
हल्लागुल्ला जोरदार,
जल्लोष आमचा बहारदार,
हरवल्या आमच्या कागदी होड्या पैलतीरावर,
आम्ही शोधतो तो आनंद पुन्हा न येणार,
दूर गेले बालपण, मोठेझाले सवंगडी,
स्वप्नातच दिसते आता हरवलेली कागदी होडी.

अनुराधा जोशी
9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा