You are currently viewing बेंगलोरमधून तिघांना अटक

बेंगलोरमधून तिघांना अटक

बेंगलोरमधून तिघांना अटक

, डॉ. रेड्डी खूनप्रकरणात कणकवली पोलिसांची कारवाई

कणकवली :

श्रीनिवास रेड्डी (५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्या खूनप्रकरणी कणकवली पोलीस व एलसीबीच्या पथकाने कर्नाटकातून तिघांना अटक केली. त्या तीनही आरोपींना मंगळवारी मध्यरात्री कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

सुभाष सुब्बारायप्पा (३२), नरसिंम्हा नारायण स्वामी मूर्ती (३६), मधूसुदन सिद्धप्पा तोकला (५२, सर्व रा. बेंगलोर-कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तिन्ही आरोपींना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला बेंगलोरहून ताब्यात घेतले असून त्याला घेऊन कणकवलीच्या दिशेने रवाना झाले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा