You are currently viewing सौ. मानसी परब यांना ‘राष्ट्रीय समाज कर्मयोगी पुरस्कार’ प्रदान! 

सौ. मानसी परब यांना ‘राष्ट्रीय समाज कर्मयोगी पुरस्कार’ प्रदान! 

अभिनेते संजय मोहिते यांच्या हस्ते झाला सन्मान!

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांना कोल्हापूर येथे ‘राष्ट्रीय समाज कर्मयोगी पुरस्कार’ देऊन सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक संजय मोहिते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने आयोजित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ – गौरवगाथा सन्मान सोहळा, कोल्हापूर – २०२५’ अंतर्गत हा मानाचा पुरस्कार मानसी परब यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते संजय मोहिते, ‘विसावा’ आश्रम पुणेच्या संस्थापिका सौ. स्वाती तरडे, बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यशववंत शेळके, गोव्याचे सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र उसगावकर, इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सौ. मानसी परब यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असून त्या युवक व युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मानाचा ‘राष्ट्रीय समाज कर्मयोगी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा