दांडेली येथे ३१ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन…
सावंतवाडी
श्री देव दाडोबा देवस्थान आणि ग्रामस्थ मंडळ, दांडेली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दांडेली येथे होणार आहे.
यात प्रथम क्रमांक पारितोषिक १५,०००, मोतीलाल कामत पुरस्कृत, व्दितीय क्रमांक पारितोषिक ११,००० अंकित धाऊस्कर पुरस्कृत, तृतीय क्रमांक पारितोषिक ७,००० दशरथ मुळीक पुरस्कृत व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट पखवाज/ढोलक, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज/टाळ, उत्कृष्ट ढोलकी, उत्कृष्ट गजरी असे प्रत्येकी १००० असे वैयक्तिक पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत ७ ते ७.३५ श्री देवी माऊली भजन मंडळ, साटेली, ७.४५ ते ८.२० श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ, कणकवली, ८.३० ते ९.०५ श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर, वेंगुर्ला, ९.१५ ते ९.५० रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी, १०.३० ते ११.०५ सिद्धिविनायक प्रा. भजन मंडळ, जानवली, ११.१५ ते ११.५० रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ, घोटगे, १२ से १२.३५ श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी आदींची भजने होणार आहेत. अधिक माहितीसाठी सचिन पांगम ८२७५३८१४८९, ओंकार परव ९४२०७३३७२७ यांच्याशी संपर्क साधावा.
