*हिंदुधर्मीयांनी वसुबारस सण उत्साहात साजरा करावा .*
आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी . या दिवशी *वसुबारास* हा सण साजरा केला जातो . ह्या वर्षी वसुबारास *शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर* रोजी आली आहे .
वसुबारास याचा अर्थ म्हणजे द्रव्य ( धन ) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी . या दिवसाला गोवस्त द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने त्या दिवसाचे महत्त्व विशेष आहे .या दिवशी गाईची पाडसासह पुजा करतात.
तरी प्रत्येक हिंदुधर्मियांनी व गो – पालकांनी उत्साहात ” वसुबारास सण ” उत्सव म्हणून साजरा करुया , असे आवाहन हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने करण्यात येत आहे .
