You are currently viewing माझ्या मराठीची बोलू कौतुके

माझ्या मराठीची बोलू कौतुके

*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझ्या मराठीची बोलू कौतुके*

 

” शारदा सरस्वती वागीश्वरी,

अशी ही माझी माय मराठी”.

पहिली जन्म दाती आणि दुसरी ही मातृभाषा…. दोघी आपल्याला घडवतात.

नुसतं मराठी ऐकलं , वाचलं, बोललं तरी मन कसं ऊचंबळुन येते.

इतिहासाने गौरवलेली ही प्राचिन भाषा… समृद्ध होत गेलेली, एखाद्या नदीसारखी… दोन्ही तिरांवरलं पोटात घेऊन फुगत जाणारी.अशी ही आमची साहित्य गंगा आहे.

जे जे पोटात घेतलं ते ते ऊत्तमच होतं आता ती समृद्ध अशा सागरात सामावली आहे. तिने त्या साहित्याची किर्ती साता समुद्रापार पोचवली आहे.

आकार, ऊकार वेलांट्या अशा अलंकारांनी नटलेली ही सरळ साधी सहज सोपी अशी आहे.

शिवरायांच्या आधीच्या काळात आपल्या थोर संत महंतांनी आपापल्या बोलीभाषेत अभंग ,भारूड, किर्तन प्रवचन ओव्या प्रहसने इ. रचुन समाजात जाती भेद ,भुतदया, समानता, बंधुभाव शिकवत. अंधश्रद्धा नष्ट केल्या व एक क्रांतीच या भाषेमुळे केली.

पुढे शिवरायांनी याच भाषेची धुळ मस्तकावर लावत स्वराज्य तोरण बांधले.हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि रक्षण केले.

संत साहित्यात माय मराठीचा ध्वज मिरवला गेला तर वारकर्यांनी हीची पताका खांद्यावर नाचवली.

अनेक व्यवसायांतुन समाजाने यात वर्हाडी खानदेशी, पहाडी, मालवणी, बुर्हाणी, संस्कृत प्राकृत, कोंकणी अशा अनेक भाषेची भर पडली.भाषेचा गोडवा माधुर्य वाढतच गेले.

निरक्षर बहिणाबाईच्या कविता, जनाईच्या जात्यावरच्या ओव्या गोड अभंग भारूडे आज अभ्यासाचा विषय बनला आहे.

समाजाने अवहेलना केली पण सहनशील ज्ञानोबांनी या भाषेला “भावार्थ दिपिका’लिहुन पहिला अलंकार चढवला आणि जगाच्या कल्याणासाठी “पसायदान’मागितले

रामदासांनी ‘दासबोध’,श्लोक, आरत्या लिहिल्या. गिताई लिहिली गेली.

पुढे आमच्या साहित्य रत्नांनी हीचे आभाळ सतत लखलखते ठेवले.

सलस्वती देवीचाच स्पर्श झालेल्या सारस्वतांनी कथा, कादंबर्या, चरित्रे, शब्द कोष, लिहुन या भाषेला रत्नजडित कोंदणातच बसवले.

शब्द ब्रम्ह म्हणजे देवी शारदेची ऊपासनाच आणि साहित्य म्हणजे या ब्रम्हांडाचाच अविष्कार!

ग. दि. मांचे गीत रामायण, कुसुमाग्रजांचे ययाती ही कादंबरी, नटसम्राट हे नाटक, पु.लंची विनोदी साहित्य शांताबाई, महानोर, पांडगांवकर, बापट साने गुरूजींचे शामची आई, बालकवींचे साहित्य इंदिरा संत पद्मा गोळे ….. किती नावे घ्यायची?

सगळे टपोरे चमकणारे बुलंद मोतीच!

अनेक नाटके, काव्य, कथा चित्रपट, कांदंबर्या आजही गाजत आहेय.

यातलीच गाणी गाऊन लताताईंनी मराठीला जगभर पोचवले.

आमची झोळी फाटकी म्हणुन पाहिजे तेवढी आत्मसात करू शकलो नाही.

पण साहित्याचा फडशा मात्र पाडलाच . या साहित्याचा राजहंसी डौल मनात रूजवायचा प्रयत्न केला.मन मानसी या भाषेचे गारूड चालवले.

या भाषेला नुसतंच माधुर्य नाही तर शौर्य, करूणा, घृणा, जिव्हाळा संताप विनोदी अशा अनेक भावनांची नक्षीदार किनार आहे.

महाराष्ट्रात जन्मलो… मराठी बोलतो.. मराठी ऐकतो.. हे आमचे भाग्यच आहे.तिचा अक्षर अक्षर म्हणजे एक स्वर आहे, आणि त्याला अमृताचा स्पर्ष आहे.

असा हा मराठीची साहित्य गंगा संथ व शांत वहातच आहे.

हीची अभिजाततेची ओळख पटली आणि केंद्र सरकारने तिला “अभिजात दर्जा’देऊन गौरव केला.

मातृभाषा दिनी.. या माय मराठीच्या वैभवाला, समृद्धीला मानाचा मुजरा.

संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव करत पसायदान लिहित आपला जीवच ओवाळुन टाकला आहे.

त्यातही ज्ञानपीठ पुरस्काराने तिची शान जगभर झळकली.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा