*वैभववाडी महाविद्यालयात मत्स्यपालन औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयालयातील प्राणीशास्त्र विभागातर्फे व पी.एम.उषा योजने अंतर्गत मत्स्यपालन औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा
आयोजित केली आहे. सदर कार्यशाळा ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी होत असून जिल्ह्यातील
महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खुली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणीही इच्छुक व्यक्ती या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. कार्यशाळेत तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून, सहभागींना मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या संधी, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि इतर उपयुक्त माहिती मिळणार आहे. प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण केलेल्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे.
तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि व्यक्तींनी अधिक माहितीसाठी प्राणीशास्त्र विभागाशी संपर्क (+918087555465 ) साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्हि. गवळी यांनी केले.
