पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा शुक्रवार २६ रोजीचा जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्ग
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शुक्रवारी २६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे –
शुक्रवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभागांचा आढावा बैठक ( ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ), दुपारी ११.४५ वा. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ मंडळच्यावतीने “सेवा पंधरवडा” यानिमित्ताने Vocal for Local च्या माध्यमातून स्वदेशी वस्तु, लघु उद्योजक व स्वयं उद्योग सहाय्यता गट यांच्या उत्पादन कार्यक्रमास उपस्थिती ( ठिकाण – मराठा समाज हॉल, कुडाळ ), दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे बैठक ( ठिकाण – शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी ) असा त्यांचा दौरा आहे.
