You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या एकोणसाठाव्या मासिक कार्यक्रमात पुस्तकचर्चा

साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या एकोणसाठाव्या मासिक कार्यक्रमात पुस्तकचर्चा

सावंतवाडी :

आजगाव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग एकोणसाठावा मासिक कार्यक्रम रविवार दि.२१ सप्टेंबर रोजी सायं. ४.३० वाजता शिरोडा येथील सचिन गावडे यांचे घरी आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तकचर्चेसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सचिन गावडे, प्रा. नीलम कांबळे आणि डाॅ.गणेश मर्ढेकर हे सदस्य अनुक्रमे लस्ट फॉर लालबाग-ले.विश्वास पाटील, झपाटलेले सहजीवन-ले. भारत व प्राची पाटणकर आणि पहिले प्रेम-ले. वि.स खांडेकर अशा त्यांना भावलेल्या पुस्तकाविषयी विवेचन करतील. त्यानंतर त्यावर चर्चा होईल.

तरी या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा