*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम अभंग रचना*
*शिक्षक*
शीर्षक…. आमचे गुरू
शिक्षकदिनाला । आदरे स्मरण।
विनम्र नमन ।आपणास।।
प्राण केले गोळा।विद्यार्थी हा घडो।
देशासाठी पडो।सत्कारणी।।
विसरत नाही।अजून ती कळ।
हातावर वळ। योग्य शिक्षा ।।
शिकवण्यासह।व्यक्तीत्व विकास।
केले जीवनास। परिपूर्ण।
अव्वल ठरता।कौतुक डोळ्यात।
पाठीवर हात।आधाराचा।।
००००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
