You are currently viewing कुडाळमध्ये सिंधुदुर्गचा राजाचे संतोष चव्हाणांनी घेतले दर्शन

कुडाळमध्ये सिंधुदुर्गचा राजाचे संतोष चव्हाणांनी घेतले दर्शन

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातील सिंधुदुर्गचा राजा हा गणेशोत्सव मंडळाचा गणराय दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मंडळाने उभारलेली देखणी सजावट, प्रकाशयोजना व सुंदर देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांची गर्दी होत आहे.

आज या राजाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी कुडाळ येथे भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख विनायक राणे आणि शहर समन्वयक राकेश नेमळेकर उपस्थित होते. दर्शनानंतर सर्वांनी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांगीण विकास, समाजातील ऐक्यभाव आणि भाविकांच्या आरोग्य-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

सिंधुदुर्गचा राजा हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, जिल्ह्यातील गणेशोत्सवांमध्ये अग्रगण्य मानले जाते. भाविकांसाठी आकर्षक सजावट, धार्मिक वातावरण आणि समाजकार्यामुळे या मंडळाचा गणेशोत्सव अविस्मरणीय ठरतो.

“सिंधुदुर्गचा राजाचे दर्शन घेऊन मनाला एक विशेष समाधान लाभले. जिल्ह्यातील प्रत्येक घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली,” असे दर्शनानंतर संतोष चव्हाण यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा