You are currently viewing डळमळीत आरोग्य यंत्रणा, बस स्टॅन्ड, रस्त्यावरील खड्डे व वन्य प्राण्यांमुळे दररोज होणारे अपघात यामुळे सावंतवाडी शहराची अस्मिता धोक्यात – रवी जाधव

डळमळीत आरोग्य यंत्रणा, बस स्टॅन्ड, रस्त्यावरील खड्डे व वन्य प्राण्यांमुळे दररोज होणारे अपघात यामुळे सावंतवाडी शहराची अस्मिता धोक्यात – रवी जाधव

डळमळीत आरोग्य यंत्रणा, बस स्टॅन्ड, रस्त्यावरील खड्डे व वन्य प्राण्यांमुळे दररोज होणारे अपघात यामुळे सावंतवाडी शहराची अस्मिता धोक्यात – रवी जाधव

सावंतवाडी

सावंतवाडी शहर पूर्णपणे खड्डेमय झाले आहे. तसेच आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजले आहेत तर वन्य प्राण्यांमुळे दररोज अपघात होत आहेत तसेच तलावाच्या काठी व शहरात रस्त्याच्या बाजूला लावलेले बॅनर मुदत संपून सुद्धा जैसे थे आहेत सावंतवाडी नगरपरिषद त्यावर कान डोळा करत आहेत ते बॅनर रस्त्यावर पडून सुद्धा अपघात होत आहेत. येथील सर्वसामान्य नागरिकाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही याचा विचार येथील नेत्यांनी केला तर बरं होईल.
येथील नेत्यांनी आपल्या कर्तुत्वाचे अजून खूप मोठ बॅनर लावावेत त्याबद्दल जरा सुद्धा वाद नाही परंतु त्याचबरोबर सामाजिक कार्य म्हणून आरोग्य यंत्रणा, वन्य प्राणी समस्या तसेच शहरातील खड्डे बुजवण्यासाठी थोडे तरी प्रयत्न करावे जेणेकरून येथील नागरिकांना समाधान मिळेल.
येत्या आठ दिवसात नगरपरिषदेने खड्डे न बुजवल्यास पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल कारण येथील प्रत्येक नागरिकाचा जीव अनमोल आहे आणि त्यांची काळजी घेणे हे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कर्तव्य आहे असे रवी जाधव यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा