You are currently viewing एकदातरी भटकंती केली पाहिजे

एकदातरी भटकंती केली पाहिजे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

 

*’एकदातरी भटकंती केली पाहिजे’*

 

माणसाच आयुष्य म्हटलं म्हणजे खूप गुंतागुंतीच असतं एकाच चौकटीत गुरफटलेल असल्यामुळे आहे त्या परिस्थितीचा सामना करून जगण्याच खडतर गाड ओढतं न्याव लागतं. सकाळ झाली म्हणजे प्रपंचाची चिंता असते मग त्यांच्यासाठी जिवाची घालमेल करून धावपळ करावी लागते अर्थात दिवसाची सुरुवातच इतकी जिवघेणी असते की धावपळ केल्याशिवाय पर्याय नसतो.या पळापळीत जराही उसंत मिळाली तर शपथ.ही सगळी धावपळ पोटासाठीच ना.रोजच तेच जगणं तेच काम तशीच मरमर शिवाय काम करूनही चारही बाजूने कोंडमारा होतो.घरचे काय बोलतील,कामावर कोन काय बोलतील,प्रवासात,गर्दीच्या ठिकाणी कोण काय बोलत ही संघर्षाची कसरत कधीच संपत नाही.शेवटी काय तर जगण्याचा रहाटगाडा ओढण्याशिवाय पर्याय नसतो.पण जीवन आणि जगणं या दोघांमध्ये एक अध्यात्मिक मार्ग आहे की जो आपल्याला कुठेतरी मोक्षाच्या किंवा शांतीचा मार्ग दाखवतो.एक विरूगळा का होईना रोजच्या कामाच्या दगदगीतून कुठेतरी मनाला ही शांतता हवी असते.अंगातील मरगळ झटकून टाकण्यासाठी कुठेतरी विरंगुळा ही मिळायला हवा.मनाला ताजेतवाने वाटण्यासाठी,अंगात पुन्हा नव्याने उर्जा,मिळण्यासाठी कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन प्रसन्न व्हायला हवं म्हणून बरेचजण कुटुंबासह फिरायला जातात.आणि खरचं वर्षातून एकदा कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन मनमोकळ व्हायचं थकलेल्या मनाला पुन्हा उत्साहीत करायचं.दमलेल्या देहाला शांतता‌ मिळण्यासाठी कुठेतरी कधीतरी घर सोडून बाहेर फिरायला गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं म्हणून मी सुध्दा भारताच मुख्य केंद्र असलेल बेंगलोरस्थीत श्री कृष्णा मंदिर अर्थात इस्कॉन टेंपलला गेल्या आठवड्यात भेट दिली आणि त्या मंदिराच्या आवारात प्रवेश करताच डोळ्याचं पार्ण फिटलं.‌त्या मंदिरच सौंदर्य डोळ्यात भर भरून सठावून घेतलं. मनाला भुरळ घालणार ते मंदीराचे देखणं रुप इतकं काही विलोभनीय होत की विचारूच नका.शिवाय तिथली स्वच्छता,शिस्त, तिथल्या सेवकांची नम्रता आदर अतिशय मधुर बोलणं या गोष्टींनी मी भाराऊन गेलो.इस्कॉन मंदिरच इतकं सुंदर देखण आहे की आपण काय बघतोय जणू स्वर्गातच आलोय की काय याची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही. पुर्णतः सोन्याच मंदिर बघण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.हरे *कृष्ण हरे कृष्ण,कृष्ण,कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे*.हा हळव्या स्वरातला अंगावर शहारे आणणारा मंत्र ऐकून आपोआप डोळे बंद होतात,नकळतपणे माणूस त्यात लिन होवून जातो.श्री कृष्णाचे भजन,आरत्या परमेश्वराची एका सुरात म्हटली जाणारी प्रार्थना ऐकून कान तृप्त होतात आणि माणूस आपोआप त्यात हरवून जातो.आरती नंतर कृष्णलिला अर्थात भगवंताच्या सानिध्यात आनंद व्यक्त करण्यासाठी सारे सेवक,पुजारी नृत्यात इतके एकरूप होवून नाचतात की आपलेही पाय थिरकायला लागत आणि आपणही त्यांच्यात कधी नृत्य करायला लागतो आपल्यालाही कळत नाही.त्या मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानसाधना करताना आपलं सारं अवसान गळून पडत़ं कोण आहोत आपण?काय आहोत! सारेकाही विस्मरणात जातं तिथे गेल्यावर आपण श्रीमंत रहात नाही आपला अहमंपणा,आपला गर्व आपली पैशाची रग गुर्मी सारं काही विसरून एक सामान्य माणूस म्हणून जिथे असतो.मनात साचलेली गलीतगात्र मळकटी डोक्यात घुटमळणारे नाही ते,नको ते विचार सर्व काही निघून जातात आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण एखाद्या स्वच्छ कोऱ्या कागदासारख असल्याचं वाटतं.त्या श्री कृष्ण भगवंताच्या सानिध्यात गेल्यावर काही तरी जगावेगळ असल्याचा अनुभव होतो.मनाला प्रचंड शांतता मिळाल्यावर मन अगदी प्रसन्न होतं एक नवा उत्साह नवचैतन्य निर्माण मिळाल्याचा आनंद होते.त्या चार दिवसांत मी खूप काही मिळवलं खूप काही घेतलं,खूप काही बघितलं आणि बरंच काही शिकायला मिळालं.तिथे जाऊन चांगल्या गोष्टी पदरात पाडून जगणं काय असतं,आयुष्य कसं असावं,माणसाने कसं रहावं कसं बोलावं,कसं वागावं यांचा अनुभव घेतला. पैशाशिवाय ही माणूस जगू शकतो.हे इस्कॉन टेंपला भेट दिल्यानंतर कळतं.आपण उगाचच आपल्या श्रीमंतीला थाटमाटाला महत्व देऊन दुसऱ्यांना कमी लेखतो पण इस्कॉन टेंपला गेल्यावर आपण काय आहोत,कसे आहोत,किती चांगले आहेत हे आपोआप आपल्याला कळतं आपली खरी ओळख तिथे कळते.खरतर माणूस काहीच नसतो एक सुक्ष्म अंक्ष पेक्षाही कमी पण माणसात इतका काही गर्व भरला जातो की तो परमेश्वरालाही विसरतो.मिच श्रेष्ठ या तोऱ्यात स्वत:ला मिरवत असतो.पण आपण काहीच नसतो.दहा किलो सोन्याचे दागिने घातल्यावरही माणसांची राखच होते.मग कशाला हवा गर्विष्ठपण कशाला दुसऱ्यांना कमी लेखायचं.दुसऱ्यांना बरं वाईट बोलण्या पेक्षा आपण किती चांगले आहोत याची आठवण इस्कॉन टेंपला गेल्यावर होते.पण हे सर्व तात्पुरता असतं काहीतरी चांगलं पदरात पाडून घेण्यापेक्षा आनंद लुटण्याच्या मानसिकतेत माणसं फिरायला जातात.त्यानंतर घरी आल्यावर पुन्हा तेच जगणं तेच वागणं तसंच बोलणं काहीच बदल होत नाही. पुंन्हा मुळ पदावर येऊन पुर्वी जसं होत तसंच जगायला सुरुवात करतो आणि पुन्हा तिचं जगण्यासाठीची धावपळ सुरू होते.काही का असेना काय घ्यायच आणि स्वतःमध्ये किती बदल करून घ्यायचा हे ज्याने त्याने ठरवायच असतं पण इस्कॉन टेंपल सारख्या जगात प्रसिद्ध मंदिराला एकदा तरी भेट द्यायला हवीचं अनेकजण इथे दर्शनासाठी येतात,मन शांतीसाठी येतात,सारेकाही विसरून आंनद घेण्यासाठी येतात ब्रम्हांडातून निर्माण झालेल्या दिव्य निसर्ग सृष्टीच्या सानिध्यात मनमुराद आनंद लुटायला येतात.आणि खरचं एकदातरी गेल पाहिजे जगणं तर रोज असतं. माणूस स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त जगतो,जगण्याच रहाटगाड रोज हाकलतो पण स्वतःला आत्मशांती देऊ शकत नाही.दुसऱ्यांनी आपल्यावर अपेक्षीत रहायचं पण आपलं काय?हा प्रश्न फक्त स्वतःलाच पडतो दुसऱ्याला नाही.म्हणून थोडं वास्तव्यातून बाहेर पडून स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच परिक्षण करण्यासाठी अशा शांत ठिकाणी गेलं पाहिजे.माझी अवस्था काही वेगळी नाही तेच जगणं तेच रडगाणं तिचं आणि तशीच जिवघेणी धावपळ स्वत:च काही अस्तित्वात नाहीत म्हणून मी काही दिवस का होईना या सागळ्या कचाट्यातून थोडं वेगळं होण्यासाठी स्वताला आत्मसमर्पण करण्यासाठी अशा निसर्गरम्य परिसराला भेट दिली.आणि खरंच लोकं आनंद घ्यायला जातात मी आनंद पांघरूण आलो याच मला समाधान आहे.म्हणून कधीतरी अशा धार्मिक स्थळाला भेट देऊन स्वतःच स्वत:चं परिक्षण केल ना तर आपण काय आहोत. त्या भगवंताच्या नजरेला नजर देऊन ध्यान मुद्रेत बसल्यावर आपोआप आपल्याला कळतं की आपण इतरांसाठी किती धावपळ करतो आपल्यासाठी कोण काय करतं अशा शांत निवांत ठिकाणी आपल्या कळतं कोण आपल,कोण परक.खरतर कोणीच आपलं नसत सारे मतलबी असतात जो पर्यंत मिळत तोपर्यंत सगळे जवळ असतात जेव्हा देणं बंद झालं तेव्हा नातेवाईक तर जाऊच द्या आपले मुल सुध्दा आपले नसतात.तेव्हा कळतं आपण बरंच काही हरवून बसलेलो असतो.बरच काही आपल्या हातून निसटून गेलेलं असतं ज्यांना आपण आपले म्हणतो ते जेव्हा आपल्या पासून दुर होतात तेव्हा कळतं आपण काय जगलो कुणासाठी जगलो कशासाठी जगलो.आपण तर सर्वांसाठी झालो पण माझ्यासाठी कोणीच नाही?.त्यावेळी आपल्या सोबत कोणीच नसतं आपण एकटे असतो.आपल्याला विसरुन ते मौज मस्तीत जगतात जगण्याचा आनंद घेतात मजेत राहतात आणि आपण त्यांच्यासाठी धावपळ करतो.तेव्हा आपलं कोणीच नसतं.त्यावेळी आपल्याला कळतं आपण खूप काही केलं पण आपल्या हाती काय आलं!.काहीच नाही म्हणून जगुन घ्यायच स्वतःसाठी स्वत:ला हरवून द्यायचं जेव्हा आपण फक्त आपल्यासाठी जगतो ना तेव्हा जग काय असतं कळत.स्वत:ला ओळखता आलं म्हणजे आनंदाची परिसीमा गाठली समजा.नाहीतर तिचं कुरबूर,तेच रडणं चेहऱ्यावर कधी आनंद दिसतं नाही.ज्या दिवशी सगळे आपल्यापासून दुर होतील किंवा आपल्याला सोडून जातील आणि आपण एकटे पडू तेव्हा कळेल की खरंच आपलं जगायचं राहूनच गेल. म्हणून एकदा स्वस्त:मधे नवचैतन्य भरून घेतलं ना की मग पुन्हा नव्याने जगायला नवीन बळ मिळते.शेवटी काय माणसाच आयुष्य क्षणभंगुर आहे केव्हा काय होईल काही सांगता येत नाही.मग जगण्याच्या या रहाटगाड्याला थोडं दुर ठेवून रोजच्या धकाधकीच्या धावपळीतून बाहेर पडून स्वतःसाठी जगण्याचा आनंद घ्यायला काय हरकत आहे. पण माणसांचा काय असतं की जस जग तशी माणसं असतात त्याप्रमाणे आपल्यालाही रहावं लागत,वागाव लागतं,किती भटकंती केली तरी सरतेशेवटी प्रपंच्यासाठी जिवाची घालमेल करून धावपळ कराविच लगेते. पण काही का असेना भाकरीसाठीची मरमर तर मरेपर्यंत सुरूच राहणार असते.तरी देखील जग दुनिया आणि भारतीय संस्कृती बघण्यासाठी घराबाहेर पडायला हवंच. घर सोडून एकदातरी भटकंती केली पाहिजे.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा