You are currently viewing दोडामार्गात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दोडामार्गात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दोडामार्गात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दोडामार्ग (प्रतिनिधी) –

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट रोजी शिवसेना दोडामार्ग संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:30 वाजता शिवसेना संपर्क कार्यालय, दोडामार्ग येथे केक कापून वाढदिवस साजरा करून होणार आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे रुग्णांना फळ वाटप व हॉस्पिटलसाठी बेडशीट वाटप करण्यात येणार आहे.

दुपारी 12 वाजता न्यू इंग्लिश स्कूल, साटेली-भेडशी येथे वृक्षारोपण व साटेली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 12:30 वाजता तेरवण येथील मेंढे नागनाथ मंदिरात शिवसेना पक्षातर्फे लघुरुद्र अभिषेक करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना शिवसेना दोडामार्ग तालुका पदाधिकारी (बेसिक, युवक, महिला आघाडी), सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिवसैनिक, ग्रामस्थ व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा