You are currently viewing कुडाळ शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी अभिषेक गावडे

कुडाळ शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी अभिषेक गावडे

कुडाळ शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी अभिषेक गावडे;

ओंकार तेली यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड

कुडाळ

शिवसेनेच्या कुडाळ शहरप्रमुखपदी नगरसेवक अभिषेक गावडे यांची निवड करण्यात आली असून, ही घोषणा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत केली. याच बैठकीत माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या वेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत तालुका सचिव म्हणून राकेश कांदे, तालुका संघटक म्हणून रोहित भोगटे, तर युवासेनेच्या शहरप्रमुखपदी माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा