*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी प्रा सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आक्रोश भारत मातेचा*
*******************
बंदी करून दिडशे वर्षे
मज शरपंजरी हो केले
मौल्यवान ते वैभव माझे
क्रूर ब्रिटिश लुटून गेले।।१।।
सर्वार्थाने होते मी सक्षम
रोग ब्रिटिश जडण्या आधी
भल्या बुऱ्याचा विचार नाही
जणू डसली कायम व्याधी।।२।।
माझा आक्रोश पाहूनी पुत्र
मजसाठी ते थरथरले
कुटुंबाची तमा न करता
ब्रिटिशांविरुद्ध झगडले।।३।।
रक्त मासाचा सडा शिंपून
रक्षणास माझ्या दिले प्राण
एकत्त्वाची दाखवून शक्ती
उभारिले त्यांनी हिंदुस्तान।।४।।
अभिमान वाटे भारत भूला
धैर्य पाहून वीर पुत्रांचे
सत्ता ब्रिटिश धुळीस जाता
सार्थक झाले बलिदानाचे।।५।।
***********************************
*रचना:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
💐💐💐
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
