You are currently viewing चिराग चितारीचे मलेशियातही उत्तुंग यश.

चिराग चितारीचे मलेशियातही उत्तुंग यश.

चिराग चितारीचे मलेशियातही उत्तुंग यश.

सावंतवाडी

नुकत्याच मलेशिया येथे पार पडलेल्या जागतिक अंकगणित व अबॅकस स्पर्धेत सावंतवाडी येथील एड्युस्मार्ट इंक सावंतवाडीचा विद्यार्थी कु. चिराग पूजा राजेश चितारी याने अनुक्रमे ३रा व ४था क्रमांक मिळवला आहे. ही स्पर्धा दोन ऑगस्ट रोजी जोहर बाहरु मलेशिया येथे पार पडली होती. पुर्ण भारतातून केवळ ३५ मुलांची या स्पर्धेत निवड झाली होती.

जगभरातून २००० मुले या स्पर्धेत सहभागी झाली होती. चिरागने या स्पर्धेत भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. चिरागने अंकगणित व अबॅकस चे Obviously सावंतवाडी भटवाडी येथील एड्यूस्मार्ट इंक या संस्थेच्या संचालिका सौ. सपना पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. चिरागच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा