*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्द माझे…भाषिक ऐश्वर्य..!*
मर्मबंधनातील मनोहर ठेवींनी
आपुलकीची ऐशीतैशी केली
स्वतःची ओळख लपवाया
टोपणनावाची गरज भासली
झुगारून लाजेची वस्त्र
शब्दओढीने भरली गात्र
सुखाच्या सीमा लांघण्यास
उचलले भुलीचे अस्त्र
चुलीभोवतीचं भाषिक ऐश्वर्य
माझ्या…शब्दांनी जपलं
भावबंधनास तिलांजली देऊन
मातीचं …..ऋण राखलं
स्वच्छ मनाच्या शब्दांनी
खडे बोल ..सुनावले
इतिहासात रमणा-या शब्दांच्या
डोळ्यांत अंजन घातले
अज्ञाताच्या कुपीत बंद..शब्दांनी
भाऊबंदकी निर्माण केली
चुलीभोवतीच्या भाषिक ऐश्वर्याने
बलदंडातून ..बुलंद बनली..
बाबा ठाकूर
