You are currently viewing आमचे प्रिय मित्र कामालाकांत तथा बाळु कुबल याचा आज वाढदिवस

आमचे प्रिय मित्र कामालाकांत तथा बाळु कुबल याचा आज वाढदिवस

*आमचे प्रिय मित्र कामालाकांत तथा बाळु कुबल याचा आज वाढदिवस*,,,,,,,,,,,🌹

कामालाकांत हे नाव फार क्वचित लोकांना माहित आहे,,,,*बाळु* हे जनतेने बहाल केलेले नाव असुन समाजकारण व राजकारणात वावरत असतांना बाळु ह्या नावाने बाळु प्रत्येकाला आपलासा वाटतो,,,,,, 1989 साली युवक काँग्रेस मध्ये काम करतांना बाळु आणि माझी पहिली ओळख झाली, पहिल्या भेटीतच बाळु च्या आश्वासक देहबोली मुळे आम्ही बाळूचे मित्र बनलो,,,,, नंतरच्या प्रत्येक राजकीय प्रसंगानुरूप आमच्या भेटी, स्नेह, वाढत राहिला पण खऱ्या अर्थाने आम्ही अत्यंत जिवलग मित्र झालो 1991 लोकसभा निवडणुकी पासुन,,,,,,!!!! बाळु हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा,, संयमी,, शांत,, प्रत्येकगोष्ट विचारपूर्वक करणारा,, राजकीय गणितामध्ये वाकबगार,, थंड डोक्याने निर्णय घेणारा असा दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता होता,,,,, आणि माझ्या सारख्या गरम डोक्याच्या कार्यकर्त्याला वेसण घालण्याचे काम बाळु करायचा !!!
मी 1992 साली सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस चा जिल्हाध्यक्ष झालो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला मार्गदर्शन करण्याचे काम बाळु ने केले,,,,, त्यावेळी काँग्रेस मध्ये असणारी प्रचंड गटबाजी,,आणि ह्या गटबाजी च्या संघर्षमय राजकारणातून आम्ही कार्यकर्त्यां मधून जिल्ह्याचे नेते झालो,,,,,, त्यावेळी जिल्ह्यात मा, शरद पवार गट व मा, विलासराव देशमुख गट असे दोन सक्रिय गट कार्यरत होते,,आणि आम्ही विलासराव देशमुख गटाचे नेतृत्व करत होतो,, आणि त्यावेळेस झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक व्युहरचना,,,नियोजन,,आणि निवडणूक जाहीरनामा अशी सर्व महत्वाची जबाबदारी बाळु पार पाडायचा आणि यशाचा शिल्पकार सुद्धा बाळुच असायचा,, हे सर्व नेतृत्वगुण,, क्षमता, असुनही भिडस्त स्वभावामुळे बाळु राजकीय सत्ते च्या परिघा बाहेर राहिला,!!!!!
बाळु ला सहकार क्षेत्रातील फार मोठा अभ्यास होता,,, त्या अनुषंगाने त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्याच स्थापन झालेल्या *कृषी उत्पन्न बाजार समिती चा पहिला अध्यक्ष* होण्याचा मान बाळु ला मिळाला,, त्यावेळी बाजार समिती अध्यक्ष ह्या नात्याने केलेल्या चमकदार व प्रभावी कामामुळे बाळु ला महाराष्ट्र राज्य बाजार महासंघा वर काम करण्याची संधी मिळाली तेथे राज्यस्तरावर आपल्या कामाचा ठसा बाळुने उमटवला व जिल्ह्याला बाजार समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय ओळख करून दिली,, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत!!!,,,बाळुने स्वतःच्या बुद्धिमत्तेने *ग्राहक मंच सदस्य ते अध्यक्ष* असे आपल्या जिल्ह्यात तसेच रत्नागिरी व सांगली जिल्ह्यात प्रभावी पणे न्यायदानाचे काम केले,,,,, प्रत्येक क्षेत्रात एवढी मोठी विद्वाता व कर्तृत्व असुनही योग्य नेतृत्व नं मिळाल्याने बाळु सारख्या एका अभ्यासु व कार्यकुशल नेतृत्वा चे नुकसान झाले,,,, त्यावेळी *मा नारायणराव राणे साहेबांचे नेतृत्व* लाभले असते तर हां चाणक्य राजकीय क्षितिजावर राज्यस्तरीय नेता म्हणून चमकला असता,,,,,,, बाळु ला मोठी राजकीय पार्श्वभूमी होती,, परिपूर्ण राजकीय गुणवत्ता होती,, पण नशिबाने साथ नं दिल्याने अपेक्षित सत्तेचे दान पदरात पडले नाही,,, आणि राजकारणात गुणवत्ते पेक्षा नशिबाचा फार मोठा भाग असतो !!,,,,,,,,,,सध्यस्थितीत कोणतेही पद, पैसा नसताना समाजात मानसन्मान ,, प्रतिष्ठा,, मिळणारा बाळु सारखा लाखात एक असतो,,,,,,, बाळु च्या राजकीय व सामाजिक कार्यावर लिहायचे म्हटले तर एक ग्रंथ तयार होईल,,,,,,,,
राजकारणा व्यतिरिक्त,,,सहकार,, शिक्षण,, कला,,क्रीडा,,, साहित्य,,नाट्य,,आरोग्य ,, न्याय,,, अशा प्रत्येक क्षेत्रात बाळूचा सक्रिय सहभाग असतो,,,,,बाळु सोबत प्रवासात किंवा कोणत्याही दौऱ्यात असतांना आमच्या खुप बौद्धिक चर्चा होत असतात,, आमच्या ग्रुपमधील सर्व सदस्य नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर वैचारिक चर्चा करत असतो,,, राजकारण हा कळीचा मुद्दा असल्यामुळे त्यावर नेहमीच मत मातंतरे होत असतात,अशा ह्या सुदृढ वैचारिक देवाणघेवाणि मुळे आमच्या ज्ञानात भर पडत असते,,,,,त्यातल्या त्यात मी सिनिअर असल्याने माझी व बाळूची नेहमीच गरमागरम चर्चा होत असते,,,, पण आम्हामध्ये कधीच मनभेद होत नाहीत,,,, बाळु हा चालता बोलता ज्ञानकोष आहे,,,,,,,!! आमच्या मित्रमंडळीत बाळु हा सर्वांच्या घरातील एक प्रमुख घटक आहे,,, आमचा शिर्डी ग्रुप हा बाळुने गेली 30/35 वर्षे एकसंघ प्रेमाच्या पाशात बांधून ठेवला आहे,,,,,,, इतकी वर्षे श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने गुरुपौर्णिमेची शिर्डी वारी व तिरुपती वारी बाळूच्या मार्गदर्शना नुसार अखंडीतपणे सुरू आहे,,,दैनंदिन जीवनातील कौटुंबिक,, सामाजिक,,कोणतीही प्रिय/ अप्रिय घटना असली तरी आम्ही सर्व मित्र सल्लामसलत करतो,,, त्यात बाळु ची भूमिका मोठी व महत्वाची असते,,,,,,,, ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करतांना संकोच वाटतं नाही,, पाप पुण्याची कबुली देतांना मन कचरत नाही,,, ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटतं नाही,,, ज्याच्या जवळ मन मोकळे केल्यावर मनाचे ओझे उतरले जाते मन हलके होते रात्रीची शांत झोप लागते असे आम्हा सर्वांसाठी एकमुखी व्यक्तिमत्व म्हणजेच बाळु,,,,,,, परमेश्वराने ह्या एका व्यक्तिमत्वात सर्व गुण ठासून भरलेले आहेत असे हे सर्वांना हवे हवे से वाटणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे,,,,,,,,*अशा ह्या आमच्या मित्राला* दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो व त्याच्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत तसेच बाळु चे मार्गदर्शन व सहवास आम्हाला आयुष्यभर मिळावा हिच ह्या शुभदिनी *श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना* 🙏
शुभेच्छुक : *संदिप कुडतरकर आणि परिवार*
*सावंतवाडी*
💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा