You are currently viewing “कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना आदरांजली अभिवादन!”

“कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना आदरांजली अभिवादन!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना आदरांजली अभिवादन!”*

 

कारगिल युद्ध वीरांना करू अभिवादन

सर्व विश्र्वांत भारताचा वाढवला सन्मान।।धृ।।

 

शत्रूला चारले खडे शूरवीर सैन्यानं

लढले सैनिक प्राणांची बाजीच लावून

सर्व शहिदांचे करू स्मरण करू वंदन।।1।।

 

देशासाठी निधडेपणे केले बलिदान

थोपवले शत्रूला सरहद्दी केले रक्षण

शत्रूला लाविले परतवून आणिले शरण।।2।।

 

सर्व वीरांचा कुटुंबीयांचा करू सन्मान

ज्यांच्यामुळे आहोत सुरक्षित सुखी आपण

त्यांना करू मनानं आदरांजली अर्पण।।3।।

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा