कृषि व्यवस्थापन यंत्रना (आत्मा) अंतर्गत सभा संपन्न
कणकवली
कृषि व्यवस्थापन यंत्रना (आत्मा) सन२०२५ २०२६ अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कणकवली येथे दि. ०७/०७/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वा. शेतकरी सल्ला समिती, कणकवली ची सभा संपन्न झाली. सदर सभेत उपस्थित नुतन सदस्याचे श्री. पी.बी.ओहोळ साहेब. तालुका कृषि अधिकारी.कणकवली यांनी गुलाबपुष्प देवून स्वागत केल, तसेच शेतकरी सल्ला समितीचे नुतन अध्यक्ष म्हणून श्री.वसंत राजाराम तेंडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका कृषि अधिकारी सन्मानिय: शेतकरी सल्ला समिती सर्व सदस्य व सचिव यांनी अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
या सदर सभेमध्ये शेतकरी सल्ला समितीचे सचिव श्री. पाटील साहेब यांनी चालू सन २०२५-२६ आर्थिक वर्षात कणकवली तालुक्यासाठी आत्मा अंतर्गत ८,००,००० / रु अनुदान मंजूर झाले असे सांगितले व बाह्य निहाय कार्यक्रम राबविण्याचे नियोजन केले. तसेच शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष,मा.कृषि अधिकारी, व सर्व सदस्य यांनी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत नाविन्यपूर्ण गोष्टींचा लाभ घेवून जास्तीजास्त शेतकऱ्यानपर्यंत आत्मा योजनेचे उधिष्ट पोहचवण्यात येईल अशी ग्वाही दिली.
तसेच सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी, राष्टवादी काॅंग्रेस तालुका अध्यक्ष खाडये, सरपंच रुतु तेंडुलकर यांनी पुष्प गुच्छ देवुन सत्कार केला.आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*
