You are currently viewing सावळ्या विठ्ठला

सावळ्या विठ्ठला

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सावळ्या विठ्ठला*

 

सावळ्या विठ्ठला, आहे ना रे

मी तुझी साऊली,

हे श्याम वर्णा, आहेस ना रे

तू माझी माऊली.

 

क्षणोक्षणी असशी तू पाठीराखा

संकटाच्या चाहुली,

सहवासी मज दिसे चंद्रभागा

तू माय माऊली.

 

मनाचिया डोही, तुझे रुप रंग

सौम्य तेजी विलसे,

तव कमलमुख, अन दिव्य अंग

शाश्वती ही हृदयी वसे.

 

किरीट शिरी शोभे उभा उत्तुंग

कौस्तुभ तेजाळता,

कर्णीडूलमासोळ्या,खांद्यासंग

तुळशीने गळा सजता.

 

हळदतिलक शोभे तवकपाळी

सुगंधित तनुसावळी,

तेजपुंज मुखीमायेचीमांदियाळी भक्ती रसाची दिवाळी.

 

गर्भरेशमीवसनी रुपखुले मायेने

मंद तेवत्या समईत.

भारावले रत्नजडित अलंकाराने ममत्वाच्या निर्झरात.

 

उभा ठाकलादोन्ही कर कटिवरी

ठेऊन चंद्रभागेतीरी,

विठूमाय माझीवाटपाहेकधीची

ती उभी आहे विटेवरी.

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

वाट पाहे विठूमाय

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा