*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ज्ञानियाच्या गावा…!*
ज्ञानियाच्या गावा
विसावली आशा
शोधतो विठूला
आभाळी नकाशा
ज्ञानिया बापडा
पिंज-याचे भान
जन्मागत मरण
गर्भातले दान
ज्ञानिया विसरला
भृकुटीने ताणिला धनु
नजरेने सोडला
जाणिले अणूरेणू
ज्ञानिया न होवो
सुखासुखी घालमेल
शब्दांच्या दयेने
होईल रंगभूल
ज्ञानिया घे मुक्ती
मुक्तीची झाली सक्ती
अवकाशाचा पडला वेढा
सक्तीची झाली मुक्ती
बाबा ठाकूर धन्यवाद
